आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Saturday, August 14, 2010

नलदमयंतीकथा भाग ४

दमयंतीच्या रूपगुणांचे वर्णन ऐकून चार देव तिच्या प्रेमांत पडून तिच्या स्वयंवराला चालले होते ते नलाला वाटेत भेटले. मानव स्त्रीच्या प्राप्तीसाठी प्रत्यक्ष देवच स्पर्धेत उतरले होते ही मोठी रमणीय कल्पना आहे. इंद्र, अग्नि, यम व वरुण हे ते चार देव. नलाला पाहून त्याचे रूप व गुण लक्षात आल्यावर आपल्याला काही चान्स नाही असेंच त्याना वाटले! मात्र प्रयत्न न सोडतां त्यांनी एक डाव टाकला! त्यांनी खुद्द नलालाच आपला दूत बनवलें व सांगितलें कीं तूं दमयंतीला निरोप दे कीं आम्ही चौघे स्वयंवराला येणार आहों व आमच्या पैकींच एकाला तूं पसंत कर! देवांची आज्ञा त्यामुळे नलाला हे एक धर्मसंकट उभें राहिलें राहिलें! आपल्यापरीने त्याने ते टाळण्यासाठी सबब सांगितली कीं दमयंतीला मी एकांतात कसा भेटणार व निरोप सांगणार तेव्हां माफ करा. पण देवांना त्याची परीक्षाच पहावयाची होती. त्यांनी म्हटलें कीं आमच्या प्रभावाने तुला तिला भेटतां येईल. नाइलाजाने नलाला कबूल करावें लागलें. त्याप्रमाणे नल नगरांत गेल्यावर दमयंतीला भेटला व त्याने मन घट्ट करून देवांचा निरोप तिला सांगितला. दमयंती म्हणाली कीं मी तुम्हालाच वरण्याचा निश्चय केला आहे. नलाने पुन्हा म्हटलें कीं प्रत्यक्ष देवांना सोडून तूं एका य:कश्चित मानवाला कसें वरण्याची इच्छा करतेस? दमयंतीने सांगितलें कीं मी तुमच्या रूपगुणांवर लुब्ध होऊन तुम्हाला वरण्यासाठीच स्वयंवर मांडले आहे. नल पुन्हा म्हणाला कीं मी देवांच्या आज्ञेवरून दूत म्हणून तुला भेटतो आहें तेव्हां मला यश देण्यासाठीं तूं त्यांच्या इच्छेप्रमाणे कर. त्यांची अवकृपा न होतां तूं मला कसें वरणार? दमयंती म्हणाली कीं हे स्वयंवर आहे आणि मंडपात देवांच्या उपस्थितीतच मी तुम्हाला माळ घालीन म्हणजे तुम्हाला दोष येणार नाहीं. नल परत गेला व 'मी तुमचा निरोप दमयंतीला दिला पण तिने मलाच वरण्याचे ठरवले आहे! तेव्हा माझा नाइलाज झाला’ असें त्यांना म्हणाला.देवांनी दोघांचीहि परीक्षाच पहायचे ठरवले होते त्यामुळे त्यांनी नलाला माफ केले पण स्वयंवर मंडपात एक नवीनच युक्ति केली. ती पुढल्या भागात.

7 comments:

Anonymous said...

KAKA PUDHACHYA BHAGACHI AATURATENE VAT BAGHAT AAHE

Anonymous said...

mast, mala kitti divasanpasun nal-damayantichya katha havya hotya.. aaj milalya..

shatasha dhanyawad.

Aniket

mannab said...

प्रिय प्रभाकरजी यांस,
आपण क्रमशः देत असलेले हे नल-दमयंती आख्यान मी वाचायला सुरुवात केली आणि त्यात कमालीचा रस वाटू लागला. महाभारत वाचले आहे, असे मी आता म्हणणार नाही. तरी एक विचारतो, नल-दमयंती कोणत्या काळात होते, त्यानंतर किती शतकांनी कौरव-पांडव झाले ? या सर्व काळात देवांची उपस्थिती असते, ते काव्यात्मक की त्यात काही तथ्य आहे ? आपण लिहित असलेल्या या आख्यांनाला आधार कोणत्या ग्रंथाचा घेत आहात ? कृपया गैरसमज नसावा. धन्यवाद.
मंगेश नाबर

Pratik said...
This comment has been removed by the author.
Pratik said...

काका , महाभारतात १८ ही संख्या खूप प्रकर्षाने जाणवते......... म्हणजे उल्लेख करायचा झाला तर १८ दिवसांचे युद्ध, १८ गीतेचे अद्ध्याय , १८ औक्षिहानी सेना , आणि इतर ठिकानिही १८ या संखेचा अनुभव येतो... तर त्या बद्दल तुम्ही काही खुलासा करू शकाल काय.....????
महाभारतात १८ या संखेला इतके महत्व का आहे.......... का फ़क्त योगायोग आहे.......??

प्रभाकर फडणीस said...

आपल्याला ही कथा आवडत आहे याचा आनंद आहे. बृहदश्व ऋषीनी ही कथा युधिष्ठिराला सांगताना ’ही फार प्राचीन कथा आहे’ एवढेच म्हटलेले आहे. इतर काही कालनिर्देश नाही.
माझे लेखन कशावर आधारलेले आहे याचा खुलासा ब्लॉगच्या शीर्षकातच केलेला आहे. कथेतील देवांचा वावर तारतम्यानेच घ्यावयाचा.
१८ या संख्येबद्दल मला काही सांगता येत नाही.

sharayu said...

देवांचे आयुष्य एका मन्वंतराएवढे आहे.