आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Thursday, April 24, 2008

पांडव विवाह - भाग ४

आतां द्रौपदीच्या स्वयंवराची कथा विस्ताराने पाहूं. अध्याय १८५-श्लोक ८-१० मध्ये म्हटले आहे कीं द्रुपदाची खरी इच्छा द्रौपदी अर्जुनाला द्यावी ही होती. अर्जुनाला हरवतां येत नाही व त्याशिवाय द्रोणाचा पराभव शक्य नाही या पेचातून सुटका होण्यासाठी अर्जुनाला जामात करून घेणे हा एकच मार्ग होता. पण अडचण ही होती कीं पांडव तर लाक्षागृहात जळून मेले असे जाहीर झाले होते. पण तरीहि जर पांडव जिवंत असलेच तर अवघड पणाचे आव्हान स्वीकारून अर्जुन पुढे येईलच आणि तो जिवंत नसलाच तर मग जो कोणी वीर पण जिंकेल तो महावीरच असेल व द्रोणाविरुद्ध तो उपयोगी पडेलच या विचाराने मत्स्यवेधाचा पण लावलेला होता. स्वयंवराला आलेले लोक १५ दिवस मंडपाची शोभा पाहत होते व मत्स्ययंत्रहि निरखत होते. सोळाव्या दिवशी सुरवातीलाच धृष्टद्युम्नाने केलेल्या घोषणेत, पण जिंकण्याबरोबरच थोर कुळात जन्म, देखणा व बलवान असणे याही अटी स्पष्ट सांगितल्या. द्रौपदीने कर्णाला नाकारले ते अनपेक्षित खासच नव्हते. कर्णानेच हात दाखवून अवलक्षण करून घेतले होते!
अध्याय १८७ मध्ये ब्राह्मण समुदायात त्याच वेषात बसलेल्या पांडवाना कृष्णाने ओळखले व बलरामाला खुणेने दाखवले असे म्हटले आहे. पांडव लाक्षागृहातून वाचले असावेत अशी कृष्णाला आशा वा माहिती असावी म्हणून इतर कोणाचे नाही पण त्याचे पांडवांकडे लक्ष गेले असावे. खरे तर या प्रसंगापूर्वी पांडव व कृष्ण यांच्या भेटीचा एकहि उल्लेख महाभारतात नाही. कृष्ण कंसवधापर्यंत गोकुळात दडून होता. नंतर दीर्घकाळ जरासंधाशी युद्ध, द्वारकेला स्थलांतर, रुक्मिणीस्वयंवर, या घटनांत व्यग्र होता. पांडवांची भेट होण्याची वेळच आली नव्हती. तेव्हां तर्कानेच ओळखले असावे.
पणाचे धनुष्य सज्ज करतानाच जरासंधासारख्याचेहि बळ पुरले नाही याचा अर्थ बळापेक्षा हा कौशल्याचा प्रश्न होता. कर्ण ते करू शकला पण तो पडला सूतपुत्र! द्रौपदीने स्वत:च सांगून टाकले कीं मी सूतपुत्राला वरणार नाही. कर्णानंतर कृष्ण, यादव, कौरव वा इतर कोणा क्षत्रियवीराने प्रयत्नहि केला नाही. अखेर ब्राह्मणवेषातील अर्जुनाने पण जिंकल्यावर द्रुपद हर्षभरित झाला. हा अर्जुनच अशी त्याची खात्री झाली. कृष्णाच्या कानावर आलेली बातमी द्रुपद व धृष्टद्युम्न यानाही माहीत होती. अध्याय १९३ श्लोक ९-१३३ मध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे. खुद्द कौरवांकडे मात्र विदुर सोडून इतर कोणाला, भीष्मालाहि, पांडव जिवंत असल्याची शंका नव्हती.
एका ब्राह्मणकुमाराने पण जिंकल्यामुळे मंडपात कोलाहल झाला. पांडवांना अजूनहि कोणी ओळखले नव्हते. तेव्हाच, युधिष्टिर, नकुल व सहदेव, राजेलोकांच्या क्षोभाला तोंड देण्याचे काम भीमार्जुनांवर सोडून देऊन, त्वरेने (महाभारतांतील शब्दप्रयोग) मुक्कामाचे ठिकाणी निघून गेले. ही त्वरा कोणती होती? राजेलोकांच्या युद्धेच्छेला भीमार्जुनानी तोंड दिले. भीमाने एक झाडच उपटून सर्वांना झोडपले. अखेर कृष्णाने सर्वांना समजावले की या ब्राह्मणाने धर्मानेच पण जिंकला आहे तेव्हा युद्ध पुरे करा. युद्ध थांबले. भीम, अर्जुन व पाठोपाठ द्रौपदीहि मुक्कामाचे ठिकाणी परतलीं. युधिष्ठिर आधीच परतला होता व अर्जुनाने पण जिंकला आहे व भीमार्जुनांबरोबर द्रौपदीहि येणार आहे हे कुंतीला कळलेच होते. मध्ये भरपूर वेळहि गेला होता. यापुढचा परिचित नाट्यप्रसंग हा एक बनाव होता व त्यामागचा हेतु वेगळाच होता. पुढील भागात त्याची सविस्तर तपासणी करू!

2 comments:

Gruhini said...

Namaskar kaka,

Ha vishay niwadlyabaddal abhinandan. Mi ajach tumacha blog baghitala ani sagalya posts wachun kadhalyat. Mul katheshi wisangat asalele anawashyak chamtkar bajula sarun mahabharatakade wastunishtha drushtikonatun baghanyacha tumacha praytna stutya ahe.

Mala tumache Draupadi wiwahasandarbhatale kahi mudde patale nahit.

1) It cant be possible for pandavas to leave in waranawat for one year conisdering the fact that it was so flammable. Plus Shakuni and Duryodhan were eager to kill them and were waiting for the right opportunity. They could have got plenty of opportunities withinn this time. It was essential for pandavas to vacate lakshagruh for the same reason ASAP. So they left immidiatly after the provisions were made available. This looks more like 15 days to a month of time and not one year.

Another thing is about Draupadi's age difference. I agree with the logic that Drupad wanted revenge so he performed 'yadnya' to obtain a son who can help with Dron issue. However the fact that pandavas were unaware of Draupadi's birth story is not sufficieant proof for concluding that yadnya took place after they went to 'adnyatwas'. Hastinapur was engrossed in the 'yuvraj' politics quite a bit so its possible that nobody payed any attention on this matter since it wasn't something of their interest at that time. Besides its quite possible that Drupad kept his two children low profile for a while and later glorified the facts about them. The reason for this procrastination as I think is It would have been impossible for anyone to verify facts after long time. But luckily for Drupad his daughter was so beautiful that every king wanted her in swayamwar and nobody questioned her whereabouts so far. It was Subhadra who was quite a bit yonger to Arjun at the time of her wedding. Another potential groom for her was Duryodhan who was of similar age.Since nobody objected on this age issue, it looks like it was not against the norms. For this reason, it doesn't seem like the reason behind Draupadi not allowing Karna to participate was age.I think the main issue was he being a lowercaste. Drupad had his own reasons for not wanting this allience which you mentioned in the posts. However Draupadi herself was arrogant young lady. After her change of status and due to her newfound beauty she was quite proud and had her own prejudices. Due to this she later insulted Duryodhan in 'Mayasabha'.

P K Phadnis said...

धन्यवाद.
आपण उपस्थित केलेल्या मुद्द्यांबद्दल पुष्कळ लिहिण्यासारखे आहे.
१. पांडव वारणावतात एक वर्ष राहिले असा स्पष्ट उल्लेखच महाभारतात आहे. पांडव तेथे पोचल्यावर मागाहून लाक्षागृहाची निर्मिति झाली.
२. पांचाल राज्य कुरुराज्याला लागूनच होते. तेथे झालेल्या द्रुपदाच्या यज्ञाची माहिती हस्तिनापुरात पोचली नसेल हे संभवत नाही.
३. पांडव - द्रौपदी यांच्या वयफरकाबद्दल आधी खुलासा केला आहे.
४. सुभद्रा अर्जुनाहून पुष्कळ लहान होती हे बरोबर. दुर्योधन व भीम एकवयाचे. अर्जुन दीड-दोन वर्षांनी लहान.
५. कर्णाला द्रौपदीने नाकारले ते सुतपुत्र म्हणून. तसे स्पष्टच महाभारतात सांगितले आहे. उच्च कुळात जन्म ही अपेक्षा सुरवातीलाच सांगितलेली होती.
६ द्रौपदी स्वाभिमानी नक्कीच पण arrogant म्हणता येत नाही. दुर्योधन-दु:शासन-कर्ण सोडून इतरांशी ती कधी उर्मटपणे वागलेली नाही.
७. जेथे स्पष्ट उल्लेख नाहीत तेथे महाभारतातील व्यक्तिमत्वांबद्दल मतभेदांना भरपूर वाव आहे!
माझा महाभारतकथेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला पसंत पडला आहे असे दिसते.
पुन्हा एकदा धन्यवाद.