आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Thursday, January 15, 2009

महाभारतातील स्फुट प्रकरणे - भाग १

या लेखात आता काही स्फुट प्रकरणांचा परामर्ष घ्यावयाचा आहे. यांत काही नवीन वा आजच्या काळाला सुसंगत अशा गोष्टी नजरेला आल्या त्याबद्दल लिहावयाचे आहे.
अक्षौहिणी :
भारतीय युद्धात अठरा अक्षौहिणी सैन्य दोन्ही पक्ष मिळून लढले. बहुतेक सर्व राजांनी एकेक अक्षौहिणी सैन्य आणले होते. कृष्णाने आपले तीन कोटि गोपालांचे सैन्य दुर्योधनाला दिले होते. मात्र कौरवांच्या अकरा अक्षोहिणी सैन्याच्या मोजदादीत हे कृष्णाचे सैन्य अजिबात मोजलेले दिसत नाही.

एक अक्षौहिणी म्हणजे काय याचा पूर्ण खुलासा दिलेला आहे. १ रथ, १ हत्ती, ३ घोडे व ५ पायदळ सैनिक मिळून १ पत्ति होते. ३ पत्ति म्हणजे एक सेनामुख व त्यानंतर ३-३ च्या पटीत गुल्म, गण, वाहिनी, पृतना, चमू, अनीकिनि व अक्षौहिणि असे कोष्टक दिलेले आहे. एकूण एका अक्षौहिणीत २१८७० रथ, तितकेच हत्ती, ६५६१० घोडे व १,०९,३५० पायदळ समाविष्ट होत. नवल म्हणजे, आजहि ३ सैनिक म्हणजे एक ग्रूप, ३/४ ग्रूपचा एक सेक्शन, मग त्याच पटीत प्लॅटून, कंपनी, बटालियन, ब्रिगेड, डिविजन, कोअर अशीच व्यवस्था असते! मधल्या काळात, युरोपियन, मुघल, मराठे वा इतरांच्या सैन्याचीहि अशीच व्यवस्था असे काय?
अक्षौहिणीतील रथ व हत्ती यांची तुलना टॅंक, आर्टिलरी (तोफखाना) यांच्याशी होईल. घोडदळाची जागा आता चिलखती वाहनानी घेतली आहे. काही पायदळाच्या डिव्हिजन्स, आर्टिलरी डिविजन्स, आर्मर्ड डिव्हिजन्स एकत्र करून बनणार्‍या आर्मीची अक्षौहिणीशी तुलना करता येईल. अशा कित्येक आर्मी ग्रूप दुसर्‍या महायुद्धात दोन्ही पक्षांतर्फे लढले. एकेका राजाचे एक अक्षौहिणी सैन्य चतुरंग व स्वयंपूर्ण होते.
अठरा अक्षौहिणी सैन्य म्हणजे एकूण २५ लाख माणसे एवढ्याशा कुरुक्षेत्रावर कशीं लढलीं असतील? दुसर्‍या महायुद्धात काही शहरांसाठी झालेल्या युद्धात, उदाहरणार्थ स्टालिनग्राड, मॉस्को वगैरे, दोन्ही पक्षांकडून सात आठ लाख सैन्य लढले पण तीं युद्धक्षेत्रे खूप विस्तृत होतीं. भारतीय इतिहासातील मोठ्या लढायांत, उदा. तालिकोट, पानिपत वगैरेत ४-५ लाखांवर मजल गेली नव्हती. तेव्हां महाभारतांतील आकडेवारी खूप अतिशयोक्त म्हटली पाहिजे.

4 comments:

MyBlog said...

Very good logical thinking. There might be one more interesting way to look at it. Today India has 1.14 billion population. But definitely 5,000 years ago, population might not be a daunting problem as it is today. One can make estimates about what should have been the population of India at that time roughly .. and see if these many soldiers died .. how many people were actually left behind?

Aditya said...

नमस्कार काका...
काही दिवसांपुर्वीच तुमचा ब्लोग वाचण्याचा योग आला..तुमची लेखनशैली आणि तर्कशुद्ध विचार खूप आवडले..
पण एक प्रश्न पडला..तुमच्या लिखाणामधील जे ग्रुहीतक आहे, की महाभारतातील पात्रे ही सामान्य माणसेच होती, हे मानण्यामागचे कारण समजले नाही..
कदाचित तेव्हाचे शास्त्र आणि तंत्रद्न्य़ात खुप प्रगत असेल,आणि ते सर्व सामान्य माणसाला कळावे म्हणुन ते सोप्या भाषेत लिहिल्यामुळे अदभुत वाटत असेल..
जसे आज आपण genetics, nanotechnology अशा विषयात इतकी प्रगती केली आहे, की हे विषय सामान्य माणसाला समजावायला गेलो, तर त्यातुन एखादी अद्भुत कथाच उदयाला येईल..महाभारताचे सुद्धा कदाचित असेच असेल..
मला इतकेच विचारायचे होते, की आपण ह्या शक्यतेचा विचार केला आहात का?

आदित्य

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

महाभारतकालीन भारताची लोकसंख्या किती असेल व त्यांतील लढाऊ लोक किती व त्यातील किती कुरुक्षेत्रावर लढले असतील याचा वरवर विचार केला तरी १८ अक्षौहिणी ही अतिशयोक्ति आहे हे उघड आहे. मात्र युद्धवर्णनांत ही अतिशयोक्ति सुसंगतपणे राखलेली आहे असे वाचताना जाणवते.
महाभारतकाळी मानवसमाजाची प्रगति हा मला श्रद्धेचा विषय वाटतो. तशी श्रद्धा बाळगणारांशी माझे भांडण नाही! माझा दृष्टिकोन मी प्रथमपासूनच स्पष्ट केला आहे.

Sagar said...

Dear Phadnis kaka,
Krishane dilele 3 crore Gopalanche sainya mhanjech Hardikya Krutvarmyache sainya nahi kay?
Karan 1 akshouhini Sena he Vrushni-andhak yanchi hoti asa Mahabhtat spasht ullekh aahe.

Tari aapla vichar kalvava.

Regards,
Sagar Borkar