आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Thursday, January 22, 2009

स्फुट प्रकरणे - भाग २

उपरिचर वसूची कथा :
उपरिचर नावाचा एक धर्मशील राजा होऊन गेला. आपल्या उग्र तपश्चर्येने हा एक दिवस इंद्रपदाला योग्य होईल या भीतीने देवांनी त्याला तपश्चर्येपासून परावृत्त केले. इंद्राने त्याला, ’तूं पृथ्वीवर नित्य तत्पर राहून धर्मपालन व धर्माचा प्रतिपाळ कर, चेदि देश जिंकून तूं त्याचा राजा हो’ असे सांगितले. आपलें स्फटिकाचे गगनविहारी विमान त्याला दिले व वैजयंती माळ दिली. आपली नित्य आठवण रहावी म्हणून सज्जनाम्चा प्रतिपाळ करणारी एक कळकाची काठी त्याला दिली. इंद्राचा मान राखण्यासाठी संवत्सराच्या शेवटच्या दिवशी उपरिचर राजाने ती काठी जमिनीत रोवली व तिची पूजा केली. दुसरे दिवशी या काठीवर शेल्यासारखे एक वस्त्र बांधीत व तिची पूजा करीत. ही काठीची पूजा म्हणजे इंद्राचीच पूजा होय.
या कथेतील रूपके मला उलगडली नाहीत पण यांत गुढीपाडव्याच्या प्रथेचे मूळ स्पष्ट दिसते. मात्र आजकाल गुढीपाडव्याच्या प्रथेच्या या मूळ कथेचे स्मरण फारसे कोणाला नाही! गुढीला आपण शालिवाहनाच्या विजयाचे प्रतीक मानतो. इंद्रपूजा मानत नाही.
व्यासांची माता सत्यवती ही या उपरिचर वसूची धीवर स्त्रीपासून झालेली कन्या होय. महाभारतात सत्यवती ही धीवरांना मत्स्यीच्या पोटांत मिळाली व त्यांनी तिला राजा उपरिचराकडे नेऊन दिले असे म्हटले आहे. मत्स्यीच्या पोटात एक बालकही मिळाला होता. मात्र राजाने मुलाला ठेवून घेतले व कन्येला धीवरालाच देऊन ’तूंच हिचा सांभाळ कर’ असे सांगितले! पुत्र पुढे मत्स्य देशाचा राजा झाला. ती मत्स्यी एक शापित अप्सरा होती असे महाभारत म्हणते व ती उपरिचराच्या वीर्यापासून गर्भवती झाली असेंहि म्हणतें! याचा सरळ अर्थ धीवर स्त्रीला राजापासून हीं दोन अपत्ये झाली असाच घेतला पाहिजे. राजाने कन्येला कां स्वीकारले नाही याबद्दल महाभारत गप्प आहे. राजा जनकाने व द्रुपदाने शेतात व यज्ञात मिळालेल्या (कोणापासून झालेल्या?) कन्या सीता व द्रौपदी यांचा स्वीकार केला व त्याना राजकन्या म्हणूनच वाढवले हे विषेश! ते भाग्य सत्यवतीला मिळाले नाही.

4 comments:

Ruminations and Musings said...

तुमचा सर्व ब्लॉग मी दोन दिवसांपूर्वी वाचला. महाभारताचे सर्व खंड मी वाचलेले आहेत. वडिलांमुळे ते आमच्या घरी घेतलेले आहेत. तुम्ही इतके कष्ट घेऊन येथे नीट, सविस्तर लिहिले आहे. जे अनेकांना उपयोगी आहे. मलाही पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला.

आजची गोष्ट मला माहिती होती. पण पुढे तोच गुढीपाडवा असे आज जाणविले. धन्यवाद.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. माझे लिखाण तरुण पिढीला वाचावेसे वाटते याचा मला खरा आनंद होतो. इतके वाचक या ब्लॉगला मिळतील असे मला कधीच वाटले नव्हते. पण तसे झाले आहे.

Unknown said...

tumachte blogs aajach wachayala survat keli.....ghari mahabharat khand aahet pan kadhi wachle nawhate.....i guess aata mahabharat samzel....thank you very much!!!!

satish said...

वैदिक कालगणना वसंताच्या आरंभी अर्थात विषुवदिनी सुरु होत असे . त्यावेळी इन्द्रध्वज उभारून नव्या वर्षाचे स्वागत करायची प्रथा होती. हीच प्रथा इराण,मध्य आशिया ,रोम इथेही असायची ... पुढे वराहमिहिराच्या वेळी जेव्हा सम्पाताच्या गति नुसार वर्ष मागे घेण्याची सुधारणा बंद पडली ..व आता वर्ष आरम्भ वासंताराम्भी होत नाही ... गुढी पाडवा महाभारताच्या कालपर्यंत मागे शोधण्याची गरज मला वाटत नाही .हा दिवस फ़क्त महाराष्ट्र पुरता मर्यादित आहे ..
मला अजुन एक शंका आहे ... गुढी पाड्व्याचा गुड फ्रायडे शी काही सम्बन्ध असेल काय ?? पोर्तुगीज संस्कृतीचा मराठी वर मोठा प्रभाव पडलेला आहे . गुडी व पाडवा ह्यांच्या व्युत्पत्ति बघाव्या लागतील ..