आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Tuesday, April 27, 2010

पुन्हा सुरवात?

मित्रानो नमस्कार.
अमेरिकेतून भारतात परत आलो आहे. महाभारतातील बर्‍याच विषयांवर लिहून झाले. नवीन लेखन केव्हांच बंद झाले. नवल म्हणजे अजूनहि हा ब्लॉग उघडून वाचला जातो आहे. तेव्हां पुन्हा सुरवात करून काही लिहावे असे वाटते पण थोडी तयारी झाल्याशिवाय काय लिहिणार? प्रयत्न करणार आहे पण थोडी वाट पहाल अशी आशा आहे.
प्र. के. फडणीस

7 comments:

शांतीसुधा (Shantisudha) said...

नमस्कार,

तुमचा ब्लॉग मी पहिल्यांदाच बगते आहे. माझे पती हे एक महाभारत विषयातील संस्कृत पंडीत आहेत. पण ते अभारतीय असल्याने मराठी खूप वाचत नाहीत. पण मी त्यांना तुमचा ब्लॉग नक्की वाचून दाखवेन.

Vivek said...

प्रभाकरजी

महाभारतावरही लिखाण सुरू करता आहात का?

वाचायला आनंदच होईल.

रोहन... said...

फडणीस काका खूप वाट पहिली... ९ मे रोजी भेट होइल अशी अपेक्षा आहे... :)

प्रसाद said...

Kaka tumacha blog khupach aavadla. ya veles kahi vaidnyanic sandharbhavar lihile tar mahabharatachi aanakhi maja yeil

Sagar said...

नक्कीच लिहा काका,

तुमचे विचार जाणून घ्यायला फारच आवडते. बाकी मी नुकतेच महाभारत सर्व वाचून संपवले आहे. काही विचांरावर तुमच्याशी चर्चा करायला नक्कीच आवडेल.

Ketaki Abhyankar said...

नमस्कार. मी सध्या "प्रा. राम शेवाळकर" यांची काही व्याख्याने ऐकत आहे. त्यापैकी, "कर्ण", "महाभारतातील राजकारण" आणि "दुर्योधन" या काही कॅसेट्स ऐकल्यावर मला असे जाणवले की बर्‍याच गोष्टी मला माहीत नाहीत. जे काही महाभारत माहितीय ते लहानपणी वाचलेल्या पुस्तकांमधून,सीरियल्समधून, आणि ऐकलेल्या गोष्टींमधूनच. तर मला संपूर्ण महाभारत वाचायचे आहे. पण क्लिष्ट अशा भाषेत नाही. सहज सोप्या समजेल अश्या गोष्टी रूपात ते वाचायला मला आवडेल. तुमचा महाभारताचा व्यासंग पाहून मला खात्री वाटते की तुम्ही मला अश्या पुस्तकांची, किंवा खंडांची माहिती देऊ शकाल. तसेच तुमच्या होम पेज वरच्या माहितीमधे तुम्ही "विदर्भ मराठवाडा" कंपनी ने केलेल्या भाषांतरांचा उल्लेख केला आहे. त्याबद्दलही माहिती मिळाली तर मी आपली आभारी राहीन.

Anagha said...
This comment has been removed by the author.