आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Thursday, June 30, 2011

महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग १

काही शब्दप्रयोग आपल्या कानावर बालपणापासून पडत आलेले आहेत आणि त्यामुळे ते खरेच आहेत असे आपण गृहीत धरतो. पण ते गैरसमजुतीवर आधारलेले असतात.
१. ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ –
जयद्रथ वधाचे दिवशी कृष्णाने काहीतरी उपायाने काही काल सूर्य दिसणार नाहीं असें केले. मग जयद्रथ ‘आपण आतां वाचलो’ असें समजून गैरसावध झाला. कौरव वीरही गैरसावध झाले. जयद्रथ अर्जुनासमोर आल्यावर कृष्णाने सूर्यासमोरचे आच्छादन अचानक काढून घेतले व अर्जुनाला म्हटले ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ मग लगेच अर्जुनाने जयद्रथाला बाण सोडून मारले. अशी कथा बालपणापासून हरदास पुराणिक आपल्याला सांगत आले. आणि ती आपण खरी मानत आलो!
महाभारतात असें काही नाहीं. प्रत्यक्षात काय घडले याचे विस्तृत विवेचन मी पूर्वी केलेच आहे. अर्जुनाने अखेरचा बाण मारून जयद्रथाचा वध केला तोपर्यंत तो स्वत:च्या रथावर बसून जमेल तसा अर्जुनाचा प्रतिकार करत होता कृष्णाने अर्जुनाला सावध केले कीं ‘सूर्य अस्ताला जाण्याची वेळ जवळ आली आहे तेव्हा वेळ फुकट घालवू नकोस.’ मग अर्जुनाने तो अखेरचा बाण सोडला व जयद्रथाचा वध केला. त्यानंतरही काही काळ युद्ध चालू राहिले व मग सूर्यास्त झाला. ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ असें शब्द महाभारतात कृष्णाच्या तोंडी मुळीच आलेले नाहीत. आपले गैरसमज मात्र पक्के असतात त्यामुळे यां शब्दांना साहित्यात व व्यवहारातही अनेकदां स्थान मिळते.

1 comment:

AASHAY said...

नमस्कार!
तुम्ही म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे. असे बरेच गैरसमज महाभारतात आहेत. आपण Atlanta मध्ये राहणाऱ्या श्री. निलेश ओक ह्यांना ओळखता का? त्यांनी महाभारत ग्रंथात ( मूळ अर्थात!) नोंदवलेल्या खगोलीय निरीक्षणांचा अभ्यास करून आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन महाभारत युद्धाची कालरेषा स्थापित केली आहे. ह्यात विशेषतः अरुंधती-वशिष्ट ह्यांच्याबद्दलचे एक विलक्षण निरीक्षण आहे. महाभारत युद्ध १६ ऑक्टोबर इसवी सन पूर्व ५५६१ ह्या दिवशी सुरु होऊन २ नवेम्बर ह्या दिवशी संपलं! पुस्तकाचे नाव 'When did the Mahabharat War take place - the mystery of Arundhati' असे आहे...आणि सध्या त्याचा मराठी अनुवाद मी करतोय! तुमचे लेख वाचून आनंद झाला! :)