आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Friday, January 11, 2013

पुन्हा सुरवात.

सर्व वाचक मित्राना नम्र अभिवादन करून या ब्लॉगवर पुन्हा काही लिहिण्यास सुरवात करीत आहे. एक वर्ष अमेरिकेत होतो व महाभारत येथे कपाटबंद होते. लिहिण्यासारखे बहुतेक सर्व लिहून झाले होते. त्यामुळे नवीन लिखाण बंद झाले होते. मात्र तरीहि वाचकांच्या ब्लॉगला भेटी होतच आहेत असे दिसून येई. कधीमधी पसंतीच्या इमेलहि मिळत होत्या. काही कॉमेंट्सही लिहिल्या जात होत्या. अमेरिकेतहि हा ब्लॉग वाचणारे अनपेक्षितपणे भेटत. हल्लीच काही थोड्या काळापुरता पुन्हा मुंबईस आलो आहे. कपाटातील महाभारत खुणावत आहे. (त्याला आणखीहि एक कारण झाले आहे. तो एक स्वतंत्र विषय आहे.) तेव्हां या ब्लॉगवर पुन्हा काही नवीन लिहिण्याचा विचार आहे. वाचक पूर्वीप्रमाणेच लाभतील अशी आशा आहे.

6 comments:

Sanjay Kelaskar said...

नमस्कार
मी आपल्या ब्लॉग चा नियमित वाचक आहे .

आपले लिखाण वाचनीय असते ( आज सुचलेलं ) ,आपल्या कडून असेच आम्हाला वाचायला मिळो.
हीच आपल्याला विनंती
sanjay kelaskar

Manasi said...

महाभारतावर वाचायला आवडेल नक्कीच.

भोवरा said...

काका !!! पुन्ह्यांदा वेलकम !!!

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

सर्व वाचकांस धन्यवाद. लोभ असावा!

aruna said...

यावेळी अमेरिकेला जातांना महाअभारत बरोबर घेऊन जा. :).
माझ्या मनात काही विचार आहेत. तुम्हाला काय वाटते ते कळवा.
त्याकाळी वैद्यक शस्त्र अतिशय प्रगत असले पाहिजे. त्यांना artificial insemination, test tube baby माहीत असतील का? नाहीतर कर्ण कसा झाला? आणि कुंती तरीही कुमारी कशी राहिली?
गांधारीचा गर्भ व्यासांनी कुंभात कसा ठेवला?

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

नमस्कार.
माझ्या लेखनावरून माझी विचारसरणी आपणास कळली असेल. मी या गोष्टींकडे श्रद्धेने मुळीच पाहत नाही.
Artificial Insemination पद्धतीने अद्यापपर्यंत एका वेळेस जास्तीत जास्त ५ मुले झाल्याचे वाचले आहे. १०० कौरवपुत्र अशा पद्धतीने एकट्या गांधारीला एकाच वेळी झाले असतील असे आपल्याला खरेच वाटते काय? माझ्या मते दुर्योधन व दुःशासन, कदाचित विकर्ण हे तीनच गांधारीचे पुत्र होते. इतर कौरव धृतराष्ट्राचे पुत्र असतीलहि पण गांधारीचे नव्हेत! 'तूं माझ्या सर्वात ज्येष्ठ राणीचा सर्वात ज्येष्ठ पुत्र आहेस' असे धृतराष्ट्राने दुर्योधनाला म्हटल्याचा स्पष उल्लेख महाभारतात आहे! यावरून काय ते समजा! हा विषय मी येथेच संपवीत आहे. राग नसावा.
फडणीस