आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Monday, May 26, 2008

शिशुपालवध











जरासंधवधाची कथा व त्यावरील माझे मतप्रदर्शन आपण वाचलेत. जरासंधाच्या वधानंतर पांडवानी सर्व राजांकडे दूत पाठवून संमति मिळवून मग राजसूय यज्ञ केला. पांडवांच्या या राजसूययज्ञाच्या वेळी यज्ञ संपल्यावर सर्व राजेलोकांचा सन्मान व अहेर झाले. त्यांत प्रथम सन्मान कोणाचा करावा यावर खूप वादविवाद झाला. पांडवाना कृष्णाचा सन्मान प्रथम करावयाचा होता व शिशुपालाला हे मान्य नव्हते. यावरून झगडा होऊन कृष्णाने शिशुपाल या आपल्या दुसऱ्या वैऱ्याचा अचानक वध केला. ह्या कथेने महाकाव्यांना जन्म दिला आहे व कृष्णाला या कृत्याबद्दल महान मानले जाते. प्रत्यक्षात या कथेचा महाभारतातून चिकित्सकपणे मागोवा घेतला तर या कृत्याबद्दल कृष्णाला थोर म्हणणे अवघड आहे असे माझे मत बनले आहे. माझे या विषयावरील पूर्वीचे लेखन ट्रु-टाइप फॉन्ट मध्ये होते व तो लेख छापलेला माझेपाशी आहे त्यामुळे पुन्हा सर्व मजकूर युनिकोड मध्ये टाइप करण्याऐवजी त्या लेखाचे फोटो देत आहे. आवश्यक तर फोटोवर क्लिक करून वाचावे अशी विनंति आहे.
लेखाचा शेवटचा भाग पुढील पोस्टमध्ये वाचावा.




5 comments:

मानसी said...

nehamipramanech muddesud likhaan. kaka, pudhachya lekhaat 'sudarshan chakra' yawar jara wistarane lihal ka? tyache mahabharatatil warnan mhanje he parusharamane krushnala vishnucha awatar ahe he samajun dile, te mantra mhantach prakat hot ase wa ekhadyacha wadh karun krushnakade parat yet ase he sagale jara atishayokta watate. Parashuram ha koni ek wyakti nasun wansha hota jo ramayan kalapasun astitwat hota ase jari gruhit dharala tari baki warnana ashakya waatataat. Yabaddal tumache mat kay ahe he janun ghyayala awadel.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

बराचसा हा ज्याच्यात्याच्या श्रद्धेचा भाग आहे. फेकून मारले असताना फेकणाराकडे परत येणारे बूमरॅंग हे एकच शस्त्र ऐकिवात आहे. भारतातील आदिवासी ते वापरत असल्याचे माझ्या वाचनात नाही. सुदर्शन चक्र परशुरामानाने कृष्णाला दिले हेहि माझ्या वाचनात नाही. तपासावे लागेल. कृष्णानेहि हे चक्र सर्रास वापरलेले नाही. शिशुपालावर कृष्णाने काय फेकून मारले हे महत्वाचे नाही. त्याने अचानक काहीतरी फेकले व बेसावध शिशुपाल मेला हे खरे व हा प्रकार उपस्थितांपैकी कोणालाहि आवडला नाही व कृष्णाला तो शोभादायक म्हणावा काय हा प्रश्न आहे. शिशुपालाचे शंभर अपराध ही एक लोणकढी आहे व ती कृष्णमाहात्म्य वाढवण्यासाठी मागाहून घुसडली आहे.

Vivek said...

Dear Prabhakarji,

Please write about the following topics:

1. Amba-Bhishma-Shikhandi.
How Shikhandi was connected with Amba?

2. Ashwatthama and massacre of Panchalas, including sons of Draupadi.

3. Khandav-van Dahan and appearance of Takshak in war (I think, offering help to Karna?) and finally murder of Parikshit.

4. During Vanvas, how Jayadrath dared to kidnap Draupadi? We can say that Keechak was unaware that she was Draupadi, but Jayadrath kidnapped her knowingly... Can you throw some light?

More topics later....

Regards

Amol Vaidya said...

krushna aani shishupal ekach vayache hote asa kuthe hi ullekh nahi aahe

Kans vadh jhalya nantar shishupal cha janm jhala la bhetayla gela aani taycha janama cha veli to tithe gela

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

शिशुपाल कृष्णाहून १४-१५ वर्षानी लहान कसा असेल? रुक्मिणीच्या पित्याला व भावाला तो रुक्मिणीच्या साठी योग्य वर वाटत होता!. तो तिच्या वयाला शोभणारा असेल तर मग कृष्ण तिच्याहून २० वर्षानी वडील होता आणि तरीहि तोच तिला शिशुपालापेक्षा जास्त पसंत होता असे म्हणावे लागेल!