ठरल्याप्रमाणे रविवार दि. २५ डिसेंबरला ’स्टार माझा’च्या वरळी येथील स्टुडिओत स्पर्धेचा बक्षीससमारंभ पार पडला. सर्वच स्पर्धक उपस्थित राहिले नव्हते तरी उपस्थिति चांगली होती. माझ्या या ब्लॉगला बक्षीस असल्यामुळे मी उत्सुकतेने गेलो होतो. ’हे TV Channel चे शूटिंग म्हनजे काय असते रे भाऊ?’ अशी मुख्य उत्सुकता होती! कार्यक्रम मजेत पार पडला. बर्याच ब्लॉगलेखकांचा कमीजास्त परिचय झाला. अनेकांचे चेहेरे ब्लॉगांवर पाहिलेले होते. श्री. प्रमोद देवहि उपस्थित होते. त्यांचेशी अनेकवार बोललो होतो, ई-मेलची देवघेव झाली होती. त्याना प्रत्यक्ष भेटता आले. परीक्षकांशी गप्पा मारून त्यांचा दृष्टिकोन समजावून घेतां आला. श्री. प्रसन्न जोशी यानी नावाप्रमाणे प्रसन्नपणे कार्यक्रम नेटका घडवून आणला.
काही ब्लॉगलेखकानी आपाअपली प्रशस्तिपत्रे हौसेने ब्लॉगवर टाकलेली पाहिली तर म्हटले आपलेहि टाकूया! मला भेटवस्त म्हणून एक Speaker cum Mike मिळाला. तो म्हणे bluetooth वर चालतो! आता हे काय नवीन लचांड? माझ्याकडे त्यातला फोन किंवा इतर काही Gadget नाही. मग मला याचा काय उपयोग होणार असे वाटले. मग Manual वाचून पाहिले तेव्हा कळले कीं त्याचा साधा speaker म्हणूनहि उपयोग करतां येईल. मग सरळ Computerलाच जोडला आणि गाणे ऐकतां आले. म्हटले चला speaker तर speaker.
तेव्हा खालचे फोटो पहा.
प्र. के. फडणीस




5 comments:
मी पहिल्यान्दाच तुमचा ब्लोग पहातोय.आनन्द झाला. महाभारतात मलाहि रुची आहे. मी तुमचे सगळे लेख वाचनार आहे. काहि अड्ल्यास नक्की विचारेन.
नुतन वर्शाच्या हार्दिक शुभेछा..
धन्यवाद !!
फार सुरेख. तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा. असेच लेखन आपणाकडून घडत राहो ही प्रार्थना.
मी आपला महाभारतावरचा ब्लोग संपवला आहे, रामायणाचा आत्ताच सुरु केला आहे वाचायला !
तुम्हाला नूतन वर्षाच्या शुभेच्छा ! :)
त्या स्पर्धेत जिंकलेल्या इतर स्पर्धकांच्या स्थळांचे दुवे देऊ शकाल का ?
स्टार माझा स्पर्धेच्या यशाकरीता खास अभिनंदन! नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
काका खूप छान वाटले तुम्हाला भेटून...
नवीन वर्षाच्या तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा !!
--तन्वी
Post a Comment