आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Saturday, September 6, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग १

महारथी म्हणून गाजलेला कर्ण ही व्यक्तिरेखा अनेक लेखकांची आवडती आहे. मराठीत त्याचेवर विपुल लेखन झाले आहे. कर्ण हा प्रत्यक्षात कुंतीपुत्र असूनहि त्याला राधेय, सूतपुत्र म्हणून सर्व जन्म घालवावा लागला हा त्याचेवर फार मोठा अन्याय झाला या दृष्टिकोनातून या बहुतेक लेखनामध्ये एक सहानुभूतीचा सूर सर्वत्र ऐकू येतो. जातिभेद, अनौरस संतति, या विषयांवर आजच्या काळातील विचारांच्या पार्श्वभूमीवर योग्यच असले तरी ज्या काळातील ही कथा आहे त्या वेळच्या समाजधारणांशी हे फारसे सुसंगत नाही. महाभारतकथेमध्ये कर्ण हे एक महत्वाचे पात्र आहे. काही प्रसंगात त्याची प्रमुख भूमिकाहि आहे. महाभारतातील या प्रसंगांतील कर्णाच्या चित्रणाचा विचार करून खुद्द महाभारतकारांना कर्ण कसा दिसत होता, इतर समकालीनांना कसा वाटत होता हे पाहाणे उद्बोधक होईल. यासाठी कर्णजन्माच्या कथेपासून सुरवात करून पूर्ण मागोवा घेण्याचा विचार आहे. अद्भुतता बाजूला ठेवून, ही सर्व माणसांची कथा आहे या भूमिकेतून मी माझे विचार मांडणार आहे. पांडवांचे काय किंवा कर्णाचा काय, जन्म देवांपासून झाले ही कल्पना वा श्रद्धा दूर सारून, विचार करावयाचा व काही ठिकाणी तर्क चालवावयाचा आहे. पुढील लेखापासून माझ्या प्रतिपादनाला सुरवात होईल. आपण वाचत रहालच असे वाटते. धन्यवाद.

5 comments:

Meghana Bhuskute said...

उत्सुकता आहे.
तुमचा ब्लॉग आवडीने वाचते, लवकर लिहा. :)

To be or not to be said...

Phar chan blog aahe tumcha.
Me kayam vachate, asach lihit raha.

Priyabhashini said...

चांगला विषय. कथाकारांनी कर्णाला दिलेली सहानुभूती हा एक डोकेदुखीचा विषय आहे असे वारंवार अनुभवले आहे.

अतिव्यग्रतेमुळे मी अद्याप जयंद्रथवधाचे भाग पूर्ण वाचलेले नाहीत. ते वाचेपर्यंत कर्णाचे भाग येतीलच.

लेखनास शुभेच्छा!

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

सर्वांस धन्यवाद

Rajan said...

eSakal chya blog varil tumchya pratikriye varun ya blog chi link milali. Tumcha Mahabharat ya vishya varil blag aavadala. Me ya pudhe hi aavarjun bhet det jain.
Thanks!